कृषी कर्ज मित्र योजना 2023 संपूर्ण मराठी माहिती

 

कृषी कर्ज मित्र योजना 2023 संपूर्ण मराठी माहिती

शेतकरी कर्ज योजना 2022 माहिती: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी कर्ज योजने संदर्भात या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या शासन निर्णयाची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप काय, कृषी कर्ज मित्र नोंदणी प्रक्रिया, प्रकरण करण्यासाठी सेवा शुल्काचा दर किती असणार, योजनेचा कालावधी किती, निधीचा स्रोत व रक्कम किती, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. तसेच कृषी कर्ज मित्र योजना GR PDF देखील तुम्हाला या लेखात पाहायला मिळणार आहे.

Krushi Mitra Yojana

कृषी कर्ज मित्र योजना २०२२ 

शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी रब्बी हंगामाकरिता खाजगी, सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँका आणि पतपेढ्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. यामध्ये शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त प्रमाणात असतो. सहकारी बँकांकडून विविध कार्यकारी सेवा, सहकारी सोसायटी यांमार्फत कर्जाचे वितरण केले जाते. सहसा शेतकरी नवीन पीक कर्ज मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो. त्याला सातबारा उतारा पासून ते बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करून सादर करावी लागतात. यामध्ये शेतकऱ्याचा बराच कालावधी जातो. कधी कधी तर हंगाम देखील संपून जातो. केवळ कागदपत्रांच्या पुरते अभावी शेतकऱ्याला वेळेवर कर्ज मिळत नाही. म्हणून नाईलाजाने त्याला खाजगी सरकारकडून जास्त व्याजाचे कर्ज घ्यावे लागते. त्यामुळॆ गरीब शेतकरी कर्जबाजारी होतो.

यामुळे अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी योजना ही योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.

कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट काय?

शेतकर्‍यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करून देणे आणि या द्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देणे. सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्याची सुटका करणे.

कृषी मित्र कर्ज योजनेचे स्वरूप काय?

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे. निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्तशेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.

अशा इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून देणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करून दिल्यास, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

कृषी मित्र योजनेसाठी प्रति प्रकरण सेवाशुल्काचा दर किती?

अ. अल्प मुदतीचे कर्ज

  • प्रथमतः पीक कर्ज घेणारा
  • पहिल्यांदाच पीक कर्ज घेणारा शेतकरी असेल, तर त्याला प्रति प्रकरण सेवाशुल्क १५०/- रुपये आकारला जाईल.

ब. मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारा

  • नवीन कर्ज प्रकरण असेल, तर त्यासाठी शेतकऱ्याला प्रति प्रकरण २५०/- रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.
  • कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण करावयाचे असल्यास शेतकऱ्याला प्रति प्रकरण २००/- रुपये सेवाशुल्क भरावा लागेल.

कृषी मित्र नोंदणी कशी करायची?

  • कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषिकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.
  • नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
  • जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार असतील.

कृषी मित्राची कामे कोणती?

  • कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी लागेल.
  • कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करतील.
  • कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी या दोघांमधील मध्यस्थांच्या भूमिके ऐवजी सहाय्यक आणि सल्लागार यांची भूमिका बजावेल.
  • प्रामाणिक पणे व पारदर्शीपणे शेतकऱ्यास सल्ला देणे आणि सहाय्य करणे याविषयीचे बंद पत्र देणे आवश्यक राहील.

कृषी मित्र योजनेचा कालावधी किती?

सदर योजनेचा कालावधी हा सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष राहील. आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे किंवा कमी करणे याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.

कृषी कर्ज मित्र निधीचा स्त्रोत व रक्कम –

जिल्हा परिषद स्वनिधी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार कृषी खर्चाची मर्यादा उपाये १० लाख पर्यंत निश्तित केली गेली आहे

Comments

Popular posts from this blog

अटल बांधकाम कामगार योजना (ग्रामीण) 2023: ऑनलाइन नोंदणी आणि PDF अर्ज डाऊनलोड | Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

सुकन्या समृद्धि योजना 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती | Sukanya Samruddhi Yojana 2023

महिला कर्ज योजना 2023: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता